Chikkodi

आ. गणेश हुक्केरी यांच्याहस्ते अपंग महिलेला दुचाकी प्रदान

Share

 चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावातील दुंडव्वा हिरेकुरबर या अपंग महिलेला आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते दुचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले.

अपंग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्यातर्फे अपंगांसाठी मंजूर झालेल्या वाहनाचे दुंडव्वा हिरेकुरबर या अपंग लाभार्थी महिलेला आ. गणेश हुक्केरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यानंतर ‘आपली मराठी’शी बोलताना आ. गणेश हुक्केरी म्हणाले, अपंगांच्या पुनर्वसनासाठी अपंग पुनर्वसन खाते आणि अन्नपूर्णेश्वरी फाऊंडेशनने सातत्याने प्रयत्न केले आहेत. दिव्यांगांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

त्यानंतर लाभार्थी दुंडव्वा हिरेकुरबर यांनी, दुचाकी दिल्याबद्दल आ. गणेश हुक्केरी यांचे आभार मानले.  यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित शिरशेट, विक्रम शिरशेट, पांडुरंग वड्डर, पापू किल्लेकत, ज्योतप्पा कोकणे, शिवाजी कोठीवाले, सुनिल कोरे, अल्लाबक्ष पटवेगार, चंद्रकांत कुरे, राजु गुंडकल्ले, बाळू लोकरे, चिदानंद कोळी, सागर कमते, सदाशिव मगदूम आदी उपस्थित होते.

 

 

Tags: