घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांना भाजप सरकार पाठिंबा देत असल्याचा आरोप निवृत्त कमांडण्ट अरविंद घट्टी यांनी केला.
चिक्कोडीत रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना निवृत्त कमांडण्ट अरविंद घट्टी म्हणाले, रायचूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या वेळी न्या. गौड यांनी घटनाकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांची प्रतिमा हटवून त्यांचा अवमान केलाय ही बाब निषेधार्ह आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा स्वीकार देशाने केलाय.
परंतु अशा एका महापुरुषांचा अवमान न्यायाधीश गौडा यांनी केलाय. राज्यभरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. पण अद्याप सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केलेली नाही. मल्लिकार्जुन गौडा हे सवर्ण असल्याने सरकार त्यांना आपला पाठिंबा देत आहे असा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार दलितविरोधी धोरण अवलंबत आहे. लवकरात लवकर न्यायाधीश गौडा यांच्या विरोधात कठीण कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला.