Uncategorized

तीक्ष्ण शस्त्राने वार करून पत्नीचा निर्घृण खून

Share

तीक्ष्ण शस्त्राने वार करून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील चांदकवठे गावात घडली आहे.

होय, नराधम पतीने धारदार शस्त्राने पत्नीच्या डोक्यात वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील चांदकवठे गावात घडली. शीलवंती गुरुबाळ कन्याळ असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पाटील गुरुबाळ तिप्पण्णा कन्याळ याला दारूचे व्यसन होते. त्यावरून पती-पत्नीमध्ये वरचेवर भांडणे होत. त्यामुळे शीलवंती रागाने माहेरी निघून गेली होती. तिची समजूत घालून घरी नेण्यास आलेल्या गुरुबाळला, शीलवंतीने तू दारू सोडली तरच घरी येईन असे सांगितले. त्यामुळे गुरुबाळने तिच्यावर हत्याराने वार करून तिची हत्या केली. पत्नीच्या खुनानंतर तो फरारी झाला आहे. याप्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 

 

 

Tags: