दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना विजापूर अबकारी ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये किंमतीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
होय, विजापुरात चोरट्या मार्गाने दारू आणून विक्री करणाऱ्या दोन आरोपीना अबकारी पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याजवळील लाखो रुपये किंमतीचा दारूचा साठा जप्त केला. विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर शहराजवळील काखंडकी गावात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नवनाथ कराडे आणि दूंडप्पा हुमनाबाद यांना अटक करण्यात आली आहे.
हे दोघे गोव्याहून गोवा बनावटीची दारू आणून विक्री करत असल्याची निश्चित खबर मिळाल्याने अबकारी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरटी दारू व ती आणण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अबकारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लो