Uncategorized

बेळगावात सरकारी मुस्लिम कर्मचारी कल्याण संघाची स्थापना

Share

 कर्नाटक राज्य सरकारी मुस्लिम कर्मचारी कल्याण संघटनेचे बेळगावात रविवारी उदघाटन करण्यात आले.

बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या समारंभात कर्नाटक राज्य सरकारी मुस्लिम कर्मचारी कल्याण संघटनेचे उदघाटन विधान परिषद सदस्य हणमंत निराणी आणि माजी आ. फिरोज सेठ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी केएसआरपीचे कमांडंट हंजा हुसेन यांच्याहस्ते संघटनेच्या २०२२ च्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आ. फिरोज सेठ म्हणाले, कोणत्याही संघाचा उपयोग केवळ त्याच्या सदस्यांपुरती न होता, संपूर्ण समाजाला झाला पाहिजे. काही लोक आपल्या स्वार्थासाठी संघ-संस्था स्थापन करतात. परंतु तसे न करता संघ-संस्थांच्या मार्फत गोरगरीब अन गरजुंना सरकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे हा संघ केवळ मुस्लिम समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांचा म्हणून न राहता सगळ्या समाजानं त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यातून समाजात सौहार्दाची भावना प्रस्थापित झाली पाहिजे असा सल्ला सेठ यांनी दिला.

यावेळी महानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू सेठ, डीडीपीआय बी. एम. नलतवाड, डाएटचे प्राचार्य एम. एम. सिंदूर, कर्नाटक राज्य सरकारी मुस्लिम कर्मचारी कल्याण संघाचे अध्यक्ष सलीम नदाफ, सलीम हंचीनमणी, अन्वर लंगोटी, डॉ. एच. आय. तीम्मापुर, आर. सी. अत्तार आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: