हुमनाबादचे तहसीलदार प्रदीपकुमार हिरेमठ यांच्यावर झालेला हल्ला अमानुष असून, या प्रकरणी राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव येथील वीरशैव लिंगायत संघटना वेदिकेने केली आहे.
सरकारी कामात असताना हुमनाबादचे तहसीलदार प्रदीपकुमार हिरेमठ यांच्यावर बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला अमानुष आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वीरशैव लिंगायत संघटना वेदिकेच्या वतीने करण्यात आली आहे. ऍट्रॉसिटी कायद्यांचा दुरुपयोग करून अन्य समाजाच्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वीरशैव लिंगायत संघटना वेदिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप कंकणवाडी यांनी केली आहे.

