Uncategorized

दंगलजन्य परिस्थितीत जनतेला पांगविण्याचे प्रशिक्षण

Share

दंगलीच्या वेळी जनतेला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज, वेळप्रसंगी गोळीबाराचे पाऊल उचलावे लागते. या संदर्भात हुकेरी संकेश्वर आणि यमकनमर्डी पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

हुक्केरी, संकेश्वर आणि यमकनमर्डी पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव सशस्त्र राखीव दल, आर एस आय रावुल पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

आंदोलन जत्रा निवडणुका यादरम्यान अधिकाधिक जनतेची गर्दी होते. यादरम्यान अनेक वेळा अनुचित प्रकार घडत असतात. अशा परिस्थितीत नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना अनिवार्य कारणास्तव जनतेवर लाठीचार्ज अथवा गोळीबार करावा लागतो. अशी परिस्थिती निवारण्यासाठी पोलिसांनी कोणते पाऊल उचलावे यासंदर्भात प्रशिक्षणात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .

यावेळी हुक्केरी, यमकनमर्डी संकेश्वर पोलीस स्थानकातील इन्स्पेक्टर रफिक तहसीलदार, रमेश छायागोळ, प्रल्हाद चन्नगिरी, पीएसआय सिद्रामप्पा उन्नद, गणपती कोगनोळी, भिमाप्पा न्यामगौड तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: